Join us
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:31 IST

Parag Shah News: घाटकोपरमध्ये भाजपचे आमदार पराग शाह यांनी एका रिक्षाचालकाला कानशि‍लात लगावल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. 

Parag Shah Video: भाजप आमदार पराग शाह यांनी घाटकोपरमध्ये एका रिक्षाचालकाला मारहाण केली. शाह यांनी त्याला शिवीगाळही केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्प प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी आमदार शाह यांच्यावर निशाणा साधला. 'गृहमंत्री यांचा बाप असल्यानेच भाजपचे आमदार कायदा हातात घेतात आणि आता तर रस्त्यावर मारामारी करत आहेत', अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. 

घाटकोपर पूर्वमधील भागात वाहतूक कोंडी आणि फूटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडला. आमदार पराग शाह हे घाटकोपर परिसरात पाहणी करण्यासाठी गेले होते. याच वेळी जात असलेल्या रिक्षाचालकाला शाह यांनी मारहाण केली. 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, भाजपचे आमदार माजोरडे झालेत 

पराग शाह यांचा मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या हा व्हिडीओ पोस्ट करत वर्षा गायकवाड म्हणाल्या, "भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की गरीब रिक्षावाल्यांना सोडत नाही. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांनी आज एका रिक्षावाल्याला मारले, कारण त्याने वाहतुकीचे नियम मोडले."

"गृहमंत्री यांचा बाप असल्यानेच भाजपचे आमदार कायदा हातात घेतात आणि आता तर रस्त्यावर मारामारी करत आहेत! ही खरी भाजप आहे. भाजप ही मोठे उद्योगपती, कंत्राटदार यांच्यासाठी रेड कार्पेट घालेल आणि गरीब, कष्टकरी जनतेला मारहाण करण्यात धन्यता मानते", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. 

वाहतूक कोंडी आणि अनधिकृत फेरीवाले

पराग शाह यांनी या भागातील समस्यांबद्दल म्हटले आहे की, "टिळक रोड परिसरात वाढत चाललेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने निर्माण होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत नागरिकांकडून वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस व परिणामकारक कार्यवाही होत नसल्याचे लक्षात येताच, अखेर नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला."

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP MLA Slaps Rickshaw Driver; Varsha Gaikwad Criticizes Arrogance

Web Summary : BJP MLA Parag Shah assaulted a rickshaw driver in Ghatkopar, sparking outrage. Varsha Gaikwad condemned Shah's actions, accusing BJP MLAs of abusing power and attacking the poor due to their connections.
टॅग्स :व्हायरल व्हिडिओवर्षा गायकवाडभाजपाआमदारराजकारण