Prasad Lad Meets Raj Thackeray: भाजपा आमदार प्रसाद लाड सपत्नीक 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारणही कळालं, वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:59 IST2021-12-30T15:58:34+5:302021-12-30T15:59:20+5:30
भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत 'शिवतीर्थ' या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली.

Prasad Lad Meets Raj Thackeray: भाजपा आमदार प्रसाद लाड सपत्नीक 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारणही कळालं, वाचा...
मुंबई-
भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत 'शिवतीर्थ' या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लाड यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. पण ही भेट राजकीय नसून आमदार प्रसाद लाड त्यांच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन 'शिवतीर्थ'वर आले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लाड दाम्पत्याचं आदरातिथ्य केलं आणि दोघांनाही शुभेच्छा दिल्या. तसंच दोघांनाही सोडण्यासाठी त्या अगदी शिवतीर्थच्या गेटपर्यंत आल्या होत्या. शर्मिला ठाकरे आणि लाड यांच्या पत्नीमध्ये बराच वेळ गप्पा देखील रंगलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी राज ठाकरे यांचं दर्शन मात्र घडलं नाही.
प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांचे खूप आधीपासूनच चांगले संबंध आहेत. याआधीही अनेकदा प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर आल्याचं पाहिलं आहे. त्याच पद्धतीनं आजची भेट देखील राजकीय नसून केवळ कौटुंबिक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबीयांसह यंदाच्या दिवाळीत दादर येथील 'शिवतीर्थ' या आपल्या नव्या निवासस्थानी गृहप्रवेश केला होता. त्यानंतर राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी बरीच राजकीय तसेच सेलिब्रिटी मंडळी शिवतीर्थवर पोहोचली होती. यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंची भेट घेतली होती. 'शिवतीर्थ'च्या बाल्कनीमध्ये उभं राहून चर्चा करतानाचे फोटो देखील त्यावेळ व्हायरल झाले होते.