नीतेश राणे यांना तूर्त अटक नाही; कणकवली पोलिसांनी कोर्टात दिली हमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 07:32 IST2022-01-13T07:31:58+5:302022-01-13T07:32:08+5:30
२३ डिसेंबर रोजी विधानभवनाबाहेर जे घडले त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे राणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

नीतेश राणे यांना तूर्त अटक नाही; कणकवली पोलिसांनी कोर्टात दिली हमी
मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी आपल्यावर हत्येच्या प्रयत्नाचा ठेवलेला आरोप निराधार असून हे राजकीय वैमनस्यातून केल्याचे उच्च न्यायालयात बुधवारी सांगितले.
राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर त्यांना अटक करणार नाही, अशी हमी कणकवली पोलिसांनी कोर्टात दिली. पुढील सुनावणी १३ जानेवाला आहे. परब यांना केवळ एकच बुक्का दिला आणि एका बुक्क्यासाठी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. २३ डिसेंबर रोजी विधानभवनाबाहेर जे घडले त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे राणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.