'पावसामुळे लोकं मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:17 AM2021-07-19T10:17:03+5:302021-07-19T10:17:33+5:30

MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray:मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

bjp MLA atul bhatkhalkar criticizes cm uddhav Thackeray over mumbai rain accidents | 'पावसामुळे लोकं मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर'

'पावसामुळे लोकं मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर'

Next
ठळक मुद्देमुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू


मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये 31 मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर 8 जण जखमी झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये 31 मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर 8 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळांवर अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. लहान मुले, महिला, वृद्ध ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. मदत करणाऱ्यांचेही काळीज पिळवटून निघत होते. यानंतर दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला. पण, घटनास्थळावर न जाण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'मुंबईत 25 लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..' अशी टीका त्यांनी ट्विट करत केली आहे.

विविध दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू
शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी 16 रहिवाशांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. तिकडे, विक्रोळी येथे शनिवारी मध्यरात्री 2.40 वाजता सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील सहा घरांवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. येथील जखमींना राजावाडी आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी येथे दाखल चार आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल एका जखमीचा मृत्यू झाला.

यानंतर रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चांदिवली येथे संघर्ष नगरमध्ये दरडीचा काही भाग इमारतीवर पडला. यात दोन लोक जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी पहाटे पाच वाजता भांडुप पश्चिम येथील कोंबडीगल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराचा भाग कोसळून सोहम महादेव थोरात (16) हा मुलगा जखमी झाला. मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अंधेरी येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे जखमी झालेले सलीम पटेल (26) यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे सव्वाचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर झाली आहे.

Web Title: bjp MLA atul bhatkhalkar criticizes cm uddhav Thackeray over mumbai rain accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.