Join us  

'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 1:36 PM

भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं', असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

ठळक मुद्दे'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं'; आशिष शेलारांचा सेनेला टोलागेल्या 15 ते 20 वर्षांच्या गॅपनंतर भाजपा या निवडणुकीत उतरली आहेपावसाचा परिणाम मतदानावर होत आहे

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील अनेक ठिणाकी पाणी साचले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 'करून दाखवलं' म्हणणाऱ्यांनी 'पळून दाखवलं', असं म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीसाठी आमदार आशिष शेलार मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, गेल्या 15 ते 20 वर्षांच्या गॅपनंतर भाजपा या निवडणुकीत उतरली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल. मुंबईत सकाळापासून जोरदार पाऊस सुरु आहे, त्याचा परिणाम मतदानावर होत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. 'करुन दाखवलं' म्हणणाऱ्यांनी पावसानंतर 'पळून दाखवलं' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. 

दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेसमोर आपला बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विद्यमान आमदार व मंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कापून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तीन दशकांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच भाजपाकडून अमितकुमार मेहता, लोकभारतीकडून जालिंदर सरोदे, अपक्ष दीपक पवार आणि राजू बंडगर यांच्यामुळे येथील निवडणूक बहुरंगी बनली आहे.  

टॅग्स :आशीष शेलारमुंबईशिवसेनाभाजपाराजकारण