Ashish Shelar: नव्या सरकारमुळे कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्यास वेग येईल- आशिष शेलार यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 22:18 IST2022-08-11T22:17:50+5:302022-08-11T22:18:25+5:30
पारंपरिक कोळी गितांच्या ठेक्यावर वाजतगाजत विधीवत दर्याला नारळ अर्पण

Ashish Shelar: नव्या सरकारमुळे कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्यास वेग येईल- आशिष शेलार यांना विश्वास
Ashish Shelar: मुंबईतील कोळीवाड्यांचे सिमांकन, घरांचे पुर्नविकास, कोळीवाड्यातील जागांचे संरक्षण या सगळ्या कोळीवाड्यातील प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून नव्या सरकारच्या येण्याने प्रश्न अधिक जलदगतीने सुटतील, असा विश्वास भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. वांद्रे पश्चिम खारदांडा येथे कोळीवाड्यात आमदार अँड आशिष शेलार यांनी आज नारळी पौर्णिमा उत्सव आयोजित केला होता. पारंपरिक कोळी गितांच्या ठेक्यावर वाजतगाजत विधीवत दर्याला नारळ अर्पण करून समुद्राची पुजा यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आली.
कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असून वाजतगाजत दर्जाला नारळ अर्पण करुन, बोटींची पुजा करुन मच्छीमार बांधव आपली बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघतात. याचे औचित्य साधून आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गायक योगेश आग्रावकर यांच्या कोळी गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कोळी बांधव- भगिनींनी या गितांच्या ठेक्यावर फेर धरताच अवघा कोळीवाडा जय मल्हार च्या घोषणेत दुमदुमून गेल्याचे चित्र होते.