"इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तोही सांगेल की...", चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:11 IST2021-04-05T13:09:55+5:302021-04-05T13:11:04+5:30
Chandrakant Patil On Param Bir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेट बाबतच्या आरोपांवर मुंबई हायकोर्टानं आज महत्वपूर्ण निकाल दिला.

"इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तोही सांगेल की...", चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला
Chandrakant Patil On Param Bir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेट बाबतच्या आरोपांवर मुंबई हायकोर्टानं आज महत्वपूर्ण निकाल दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोर्टानं दिले असून यामुळे ठाकरे सरकारला जोरदार झटका बसला आहे. कोर्टाच्या निर्णयाचं भाजप नेत्यांकडून स्वागत केलं जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही कोर्टानं दिलेल्या निर्णायवर भाष्य करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
हायकोर्टानं सरकारला चपराक लगावलीय; हफ्तेखोरीचं सत्य आता बाहेर येईल; फडणवीसांची जोरदार टीका
"परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे इतके स्पष्ट आहेत आणि माध्यमांमध्येही त्याबाबत इतक्यांदा स्पष्टीकरण येऊन झालंय की इयत्ता आठवीतील विद्यार्थी देखील सांगेल की सरकार हे प्रकरण दाबतंय. आता हायकोर्टानंच सीबीआय चौकशीची निर्णय दिलाय तर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा. तोही जर घेतला नाही. तर महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या मंत्र्यावर सीबीआय चौकशीचे आदेश असतानाही राजीनामा घेण्यात आलेला नाही हा अनोखा प्रकार ठरेल", असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पवारांवर विश्वास ते राजीनामा घेतील
"शरद पवार साहेबांचा आजवरचा राजकारणातील अनुभव पाहता एखाद्या मंत्र्यावर सीबीआय चौकशीचे आदेश असताना ते राजीनामा घेतील असा विश्वास आम्हाला आहे. तसं त्यांनी केलं नाही तर महाराष्ट्राची जनता सारंकाही पाहत आहे. आता कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.