Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह तर प्रचारात व्यस्त होते; संजय राऊतांचा 'तो' दावा भाजपाने खोडून काढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 20:32 IST

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सध्या फक्त ट्रेलर आहे, पुढील काळात काही व्हिडीओ समोर आणणार, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच आज आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद असल्यासारखं वाटतंय. आजची पत्रकार परिषद ईडी, सीबीआयसह देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री देखील बघत असतील, असं संजय राऊतांनी म्हटलं. 

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले की, आपण खूप महत्त्वाचे आहोत, असे संजय राऊत यांना उगाचच वाटते म्हणून आपली पत्रकार परिषद गृहमंत्री अमित शाह बघत असतील, असा गैरसमज त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात ते उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत स्वतः बद्दल किती गैरसमज आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला-

माझ्या निकटवर्तीयांना मध्यरात्री त्रास दिला गेला. त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्या रात्री मी अमित शाहांना कॉल केला होता. मला तुमच्याबद्दल अतिशय आदर आहे. माझ्याशी दुश्मनी आहे, तर मला अटक करा. माझे नातेवाईक, मित्र, निकटवर्तीय त्यांना का टॉर्चर करता?, असा सवाल मी त्यांना विचारला होता, असं राऊतांनी सांगितलं.

मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार-  

देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा  आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं १२ हजार कोटींची जागा १०० कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.

टॅग्स :संजय राऊतअतुल भातखळकरशिवसेनाभाजपाअमित शाह