मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात ही निवडणूक अटीतटीची होऊन त्यात महायुतीला निसटतं बहुमत मिळाल्याने ठाकरे बंधूंच्या युतीलाही महापौरपदासाठी आशेचा किरण दिसत आहे. तसेच संख्याबळाचं गणित जुळवून काही तरी चमत्कार घडवता येईल, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
'महापौर' पदावरून भाजपाने आता ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आधी सध्या सोबत असलेले नगरसेवक सांभाळा, मग इतर मोठमोठ्या गप्पा मारा, ….तरी मला हवालदार म्हणा" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. तसेच उबाठा, पोकळ_दावे, मुंबई_महापौर, मुंबई हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
"सध्या सोबत असलेले नगरसेवक सांभाळा"
"आधी जे आहेत ते तरी सांभाळा… चार वर्षांपूर्वीही त्यांनी अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या. तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले, ते कळलंच नाही. आज पुन्हा, ‘भाजपाचा महापौर नको’, असे रडगाणे गात, पुन्हा एकदा “चमत्कार” होणार असल्याचा सूर आळवत संजय राऊत फिरत आहेत. आता तरी वास्तव स्वीकारा. आधी सध्या सोबत असलेले नगरसेवक सांभाळा, मग इतर मोठमोठ्या गप्पा मारा. ….तरी मला हवालदार म्हणा अशी अवस्था का झाली हे पाहा आधी!!" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
महापौरपदाच्या निवडीबाबत चुरस
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला ११८ जागांवर विजय मिळाला. त्यात ८९ जागांवर भाजपाचे तर २९ जागांवर शिंदेसेनेचे नगरसेवक निवडून आले. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यात उद्धवसेनेला ६५, मनसेला ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. तसेच एमआयएमला ८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ३ आणि उर्वरित जागा इतरांना मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीबाबत चुरस वाढली आहे.
Web Summary : BJP mocked Thackerays' mayoral aspirations, advising them to secure current corporators first. Keshav Upadhye criticized Uddhav Thackeray's claims of a 'miracle', referencing past political events and current election dynamics. Mumbai's mayoral election sees keen competition amid shifting alliances.
Web Summary : भाजपा ने ठाकरे के महापौर बनने की उम्मीदों पर कटाक्ष करते हुए कहा कि पहले मौजूदा पार्षदों को सुरक्षित करें। केशव उपाध्ये ने उद्धव ठाकरे के 'चमत्कार' के दावों की आलोचना की। मुंबई के महापौर चुनाव में प्रतिस्पर्धा बढ़ गई है।