Join us  

लातूरमध्ये भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का, अर्चना चाकूरकर यांचा BJP मध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:33 PM

BJP :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

BJP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

"हा निर्णय घेताना त्याचा विचार करा असं आम्हाला साहेबांनी शिकवलं आहे, हा राजकीय प्रवासाचा वैयक्तीक निर्णय आहे. राजकीय प्रवासात पहिल्यांदाच मी सुरुवात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम आम्ही बघत होतो. त्यांचा प्रवास विलक्षण आहे. सप्टेंबर महिन्यात तयार झालेल्या संसंदेत पहिला निर्णय महिलांचा झाला. तो निर्णय ऐतिहासिक होता. या निर्णयामुळे महिलांना काम करायला संधी मिळणार आहे, असंही डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याकडून सदस्यत्वाचा फॉर्म भरुन भाजपामध्ये प्रवेश दिला.  हा पक्षप्रवेश मराठवाड्यात मोठा धक्का मानला जात आहे. 

ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

"आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे मोठं नाव आहे. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. शिवराज पाटील यांनी काँग्रेस सरकार काळात गृहमंत्री म्हणूनही काम केलं आहे. हा प्रवेश भाजपासाठी महत्वपूर्ण आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. चाकूरकर यांना आम्ही २०१९ ला सुद्धा प्रस्ताव दिला होता, ् त्या आता आमच्याकडे आल्या आहेत. त्यांना निवडणुकीचं तिकीट द्यायचं की नाही, हा निर्णय पक्ष घेत असतं, असंही फडणवीस म्हणाले.

अंबादास दानवेंसोबत आमची चर्चा नाही

मराठवाड्यातील मोठ्या नेत्याचा प्रवेश आम्ही आधीच केला आहे. अंबादास दानवे यांच्यासोबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतंच नाही, तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही, असा सूचक इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. 

  

टॅग्स :भाजपाकाँग्रेस