Join us  

भाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले, संजय निरुपम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 12:38 PM

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस, अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवल्याचा निरुपम यांचा आरोप

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. अमित शाह यांना घेराव घातला जाईल, या भीतीने पोलिसांनी नजरकैदेत टाकल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी आरोप केला आहे. अंधेरीतील संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, 26 मे ते 11 जून दरम्यान समाजातील नामवंत मंडळींना भेटण्यासाठी पक्षाने  'संपर्क फॉर समर्थन' अभियान हाती घेतले आहे. त्याचा भाग म्हणून मित्रपक्षांचे नेते आणि समाजातील मान्यवर लोकांना अमित शहांसह अन्य नेते भेटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अमित शहा उद्धव ठाकरेयांच्यासह रतन टाटा,  लता मंगेशकर, माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत. याअंतर्गत शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांना भेटणार आहेत. 'संपर्क फॉर समर्थन' या मोहिमेअंतर्गत ते विविध मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांना भाजपचं काम समजावून सांगत आहेत तसेच भविष्यात भाजपला समर्थन देण्याची विनंती करत आहेत.   

टॅग्स :संजय निरुपमभाजपाअमित शाहकाँग्रेस