पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: December 1, 2023 03:48 PM2023-12-01T15:48:47+5:302023-12-01T15:49:43+5:30

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची दि,1 नोव्हेंबरची अधिसूचनेत अनिवार्य ओटीपी पडताळणीचा उल्लेख नाही.

BJP demands extension of deadline for graduate voter registration | पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

मुंबई- भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने पदवीधर मतदारसंघ नोंदणीच्या मुदत वाढीसाठी व प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करण्यात यावी ही मागणी भाजयुमो केली. मुंबई भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार अँड. आशिष शेलार, भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो युवा मोर्चा शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची भेट घेवून त्यांना  निवेदन दिले. 

याप्रसंगी शिष्टमंडळात युवा मोर्चा मुंबई महामंत्री दिपक सिंह, विध्यार्थी आघाडी संयोजक सुजय चौकीस, उपाध्यक्ष स्नेहा वेमुलकर, सचिव साहिल मिश्रा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची दि,1 नोव्हेंबरची अधिसूचनेत अनिवार्य ओटीपी पडताळणीचा उल्लेख नाही.

या अधिसूचनेनंतर 3 दिवसांनी ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली. आधीच्या सूचनेच्या 5 दिवसांनंतर, एक स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आली, ज्यात नमूद केले होते की ऑनलाइन भरलेले सर्व फॉर्म ऑफलाइन देखील भरले जातील.परत 5 दिवसांनंतर, दुसर्‍या अधिसूचनेत नमूद केलेले कलम मागे घेण्यात आले.त्यामुळे दि, 10 नोव्हेंबरच्या सुमारास ही प्रक्रिया अखेर मतदारांना समजली.सणासुदीमुळे मतदारांना अर्ज भरता आले नाहीत.सणासुदीच्या हंगामानंतर, प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली, परंतू तांत्रिक सहाय्य आणि दळणवळणाच्या अभावामुळे नोंदणीची प्रक्रिया योग्य दराने होत नाही या अनेक अडचणी शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणल्या.

मुंबईत लाखो पदवीधर मतदार असून जे त्यांचे मत देऊ इच्छितात, परंतू त्यांना मतदार नोंदणीसाठी या अनेक समस्या त्यांना येतात. त्यामुळे समितीने पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: BJP demands extension of deadline for graduate voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.