Join us  

“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 1:39 PM

भाजप नेत्यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

मुंबई: मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून विरोधकांना प्रत्युत्तर देत शिवसेनेने कथुआ आणि हथरसच्या अशाच घटनांची आठवण विरोधकांना करून दिली आहे. यातच आता भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्र वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत हा तर जोक ऑफ द डे झाला, अशी खोचक टीका केली आहे. (bjp chitra wagh replied thackeray govt and shiv sena sanjay raut over sakinaka rape and murder case)

अनिल देशमुख-परमबीर सिंग कुठे आहेत? राष्ट्रवादीने सांगितला नेमका पत्ता!

साकीनाका भागात महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक असे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेले असतानाच शिवसेनेने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कठुआ व हाथरस प्रकरणाची आठवण करुन देत विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये कायद्याचेच राज्य असल्याचे सांगत नराधमावर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. यावर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

हथरस, कथुआबद्दल संवेदना आहेत

हथरस, कठुआ देशातल्या सगळ्या घटनांबद्दल आम्हाला संवेदना आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात राहातो. ही आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या गोष्टी तुम्ही करता. पण तो तर बाजूलाच राहिला. पण या बलात्काऱ्यांना बळ देण्याचे काम तुमचे चाललेय. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला न्यायालयात जावे लागते. ज्याच्यावर एफआयआर आहेत ते बाहेर उजळ माथ्याने फिरतायत. बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला. तुम्ही घेत असलेली ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजपा घेणार. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्रश्न विचारणार आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकारच्या कारकीर्दीत बेरोजगारी प्रचंड वाढली; राहुल गांधींची टीका

दरम्यान, चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांना विनंती करणारे एक पत्र दिले आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांसाठी असणाऱ्या शिक्षेप्रमाणेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील सुनावणी, शिक्षा आणि नियम लागू करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. 

टॅग्स :राजकारणभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेसंजय राऊतचित्रा वाघसाकीनाका