संजय राऊत यांनी "येत्या मुंबई महापालिकात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पैशांचा महापूर येणार असून प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना १० कोटी रूपये देणार" असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हे गंभीर आरोप केले. यावरून आता भाजपानेसंजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
"पुन्हा सकाळचा भोंगा सुरू झाला. "उखाड दिया"ची गर्जना करुन स्वतःच्या पक्षालाच उखडून टाकतात. ते म्हणे त्यांच्या पक्षाचे हूकमाचे एक्के, विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के!!" असं म्हणत डिवचलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"मी तीन महिन्यांनी पुन्हा येईन म्हणाले... एक महिन्याच्या आतच "ते" परत आले... विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून आम्हाला ही बरेच वाटले! "त्यांचा" पुन्हा सकाळचा भोंगा सुरू झाला. महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनल बदलण्याचा हंगाम परत आला... यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी!"
"हे बोलतात... खूप बोलतात.. खूपच बोलतात. कुणाचा बाप काढतात... "उखाड दिया"ची गर्जना करुन स्वतःच्या पक्षालाच उखडून टाकतात... कुणाची अक्कल काढतात... अधिकार नसला तरी अनाहूत सल्ले देतात.. महाराष्ट्राचे तुफान मनोरंजन मात्र करतात.ते म्हणे त्यांच्या पक्षाचे हूकमाचे एक्के, विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Web Summary : BJP leader Ashish Shelar mocked Sanjay Raut's claims about Eknath Shinde's party distributing money. Shelar stated Raut's pronouncements guarantee defeat in 29 municipal corporations, criticizing his morning commentary and pronouncements.
Web Summary : भाजपा नेता आशीष शेलार ने संजय राउत के एकनाथ शिंदे की पार्टी द्वारा पैसे बांटने के दावों का उपहास उड़ाया। शेलार ने कहा कि राउत की घोषणाएँ 29 नगर निगमों में हार की गारंटी हैं, उन्होंने उनकी सुबह की टिप्पणी और घोषणाओं की आलोचना की।