Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांचा तिढा; मुख्यमंत्र्यांची आज कुलगुरूंसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 03:32 IST

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने सादर केली आहेत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाहीत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी संघटनांसह विद्यार्थी आक्रमक झाले असून आता यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी शनिवारी चर्चा करतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. याशिवाय परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर ढफडटडळएऊ किंवा एएटढळएऊचा शेरा देऊ नये. त्याऐवजी अंतर्गत मूल्यांकनानंतर ग्रेड किंवा टक्केवारी नमूद करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा पुढील अभ्यास किंवा रोजगार प्रक्रियेमध्ये उपयोग होईल, अशी मागणी महाराष्टÑ स्टुडंट युनियनने निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविद्यार्थीउद्धव ठाकरे