एका क्लिकवर जैवविविधता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 15:07 IST2020-11-29T15:07:25+5:302020-11-29T15:07:46+5:30
Biodiversity News : बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूलची निर्मिती केली.

एका क्लिकवर जैवविविधता
मुंबई : बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूलची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळामध्ये सागरी जीवांची आणि अधिवासांची नोंद आहे. नागरिक, विद्यार्थी संस्थांना याचा उपयोग होणार असून यामुळे किनारपट्टीवरील जैवविविधता एका क्लिकवर पाहता येणार आहे.
बीएनएचएसकडील माहितीनुसार, सात क्षेत्राचा शोध घेण्यात आला. जागा निवडताना कासवांची विणी, किनारे, प्रजातींचा वावर, प्रवाळ या बाबींचा विचार करण्यात आला. पालघर ते ठाणे, काशीद ते आक्षी, वेळास ते दिघी, गुहागर ते दाभोळ, रत्नागिरी ते जयगड, देवगड-विजयदुर्ग-कशेळी आणि वेंगुर्ला-मालवण-आचरा, ही क्षेत्र अंतिम करण्यात आली. क्षेत्राची १६ भागांमध्ये विभागणी करुन जैवविविधता नोंदविण्यात आली. संकलित माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. संकेतस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. जैवविविधता, अधिवास, किनारे, खारफुटी पाहता येणार आहे. संकटग्रस्त प्रजाती, संरक्षित असलेल्या प्रजातींची माहिती उपलब्ध आहे.