Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:20 IST2025-03-04T09:18:42+5:302025-03-04T09:20:19+5:30
Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी?
Ladki Bahin Yojana March Instalment:आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकार गिफ्ट देणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ८ मार्च या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार आहे, तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्चअखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सन्मान निधी !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 3, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे.
यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या… pic.twitter.com/SN0MJe8JT4
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अर्थव्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकार ही योजना बंद करील अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे, असे त्या म्हणाल्या.