राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 06:28 IST2024-03-14T06:28:47+5:302024-03-14T06:28:52+5:30
७०० पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील ७०० पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत रविवारी, १७ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
जोगेश्वरी पूर्व उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, माजी विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, महिला विभाग अध्यक्षा सायली जाधव, विभाग सचिव विलास म्हेतर, उपविभाग अध्यक्ष मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, महिला उपविभागध्यक्षा कामिनी दळवी, श्रद्धा सागवेकर, शाखाध्यक्ष रमाकांत नर, अमोल पारधी, कुणाल गावडे, किशोर पुंडे, राजेश जाधव, आकाश पाटील असे एकूण ७०० पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानत पक्षाच्या आंदोलनात आक्रमकपणे भाग घेतला. पण पक्षांमध्ये काही लोकांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे माझ्यासारखा कर्मठ निष्ठावान कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रवीण मर्गज यांनी सांगितले.