BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 20:18 IST2025-08-30T20:10:53+5:302025-08-30T20:18:26+5:30

मराठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोनलाना आणखी एक दिवस परवानगी मिळाली आहे.

Big news Manoj Jarange's protest at Azad Maidan allowed for one more day | BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे काल शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही परवानगी दिली. आता उद्यासाठी म्हणजेच तिसऱ्या दिवशीही मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.  याबाबत आंदोलकांच्या वतीने रितसर आझाद मैदान पोलिसात अर्ज करण्यात आला होता.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत.

मुंबईत कालपासून पाऊस

मुंबईत कोलपासून पाऊसही सुरू आहे.  मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यामुळे काही आंदोलकांनी काही दिवस मुकाम होणार हा अंदाज बांधत मोठ्या गाड्यांमध्ये गॅस, शेगडी, जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईत दाखल झाले. गेले दोन दिवस त्यांनी गाडीतच स्वयंपाक केला, असे बळिराम पोळ यांनी सांगितले.

 

Web Title: Big news Manoj Jarange's protest at Azad Maidan allowed for one more day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.