Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:17 IST2025-05-19T15:13:38+5:302025-05-19T15:17:36+5:30

Mumbai Vidhan Bhavan Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Big news Fire near the entrance of Vidhan Bhavan Reportedly caused by short circuit | Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही शॉर्टसर्किटमुळे लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आगीची पाहणी केली. 

"स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग आटोक्यात आणली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही थोड्या वेळात पोहोचतील. आग एवढी मोठी नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्यानंतर नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आगीची पाहणी केली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आगीची पाहणी केली.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या एका इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली आहे. ही आग भडकली.

Web Title: Big news Fire near the entrance of Vidhan Bhavan Reportedly caused by short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.