Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज; ठाकरे सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:04 IST

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुक

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

मुंबई - राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.   

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर  एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे. 

ही मदत खालील प्रमाणे राहील… 

•    जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर•    बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर•    बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर    ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीपूरशेतकरीपाऊस