Join us

Video : भेंडी बाजारातील इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:36 IST

आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 

ठळक मुद्देया भीषण आगीमध्ये फरिदा (६०) आणि नफिसा गीतम (६०) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली होती.

मुंबई -  भेंडीबाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील एका घरामध्येआग लागल्याची घटनी घडली आहे. काल रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. या घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून ११ जण या आगीत जखमी झाले आहेत. या भीषण आगीमध्ये फरिदा (६०) आणि नफिसा गीतम (६०) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. 

सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, काही वेळातच या आगीचा तीव्रता वाढल्यानं अग्निशमन दलाने रात्री ११.२३ वाजताच्या सुमारास आग मोठी असल्याचे सांगितले. तसेच चंद्रशेखर गुप्ता (३६) आणि पुंडलिक मांडे (२७), रमेश सरगर (३५) या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही अग्निशमन दलाचे कर्मचारी असून धुराचा त्रास सहन न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत जखमी झालेल्यांची नावे ताहिर नालावाला (७२), मुस्तफा सोनी (४२), फरिदा छित्तरवाला (५२), सैफुद्दीन छित्तरवाला (६२), बुहराद्दीन होतालवाला (वय २९) आणि मुस्तफा हॉटेलवाला (४६) आणि अली असगर (३२) अशी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भेंडी बाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील बोहरी मोहल्ल्यातील पंजाबी महलच्याबाजूच्या घराला गुरुवारी रात्री ही भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र, अग्निशमन दलाचे रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नाला यश आले आणि अखेर आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 

टॅग्स :आगमुंबईमृत्यूघर