Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:04 IST2025-10-30T16:04:20+5:302025-10-30T16:04:45+5:30
Mumbai Powai Student Hostage news:स्टुडिओबाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ओलीसांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी रणनीती आखत आहेत.

Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली
मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे. मरोळ, पवई भागातील एक अभिनयाचे क्लास घेणाऱ्या स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आले आहे. ही मुले या क्लासमधून मदत मागताना, काचेतून बाहेर डोकावताना दिसून आली आहेत. पोलिसांनी परिसराला घेराव घातला आणि मुलांची सुरक्षित सुटका करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच, मोठा पोलिस दल घटनास्थळी दाखल झाला. स्टुडिओबाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ओलीसांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी रणनीती आखत होते.
दरम्यान, पोलिसांनी ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला पकडले असून त्याच्याकडे पिस्तुल होती असे सांगितले जात आहे. रोहित आर्या असे या आरोपीचे नाव असून अद्याप मुले आरए स्टुडिओमध्येच आहेत.
आज मुंबई रेडिओ स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी पसरताच तिथे घबराट पसरली. माहिती मिळताच मुलांचे पालक घटनास्थळी धावले आणि बाहेर मोठी गर्दी जमली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. किती मुलांना ओलीस ठेवले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, त्यांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑडिशनच्या नावे बोलावलेले...
ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीने या मुलांना ऑडिशनसाठी बोलावले होते. सिनेमा व मालिकांत काम मिळण्याच्या आशेने पालकांनी त्यांना पाठविले होते, असे सांगितले जात आहे.