Join us

महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 18:28 IST

Congress : लोकसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Congress ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेत एनडीए'ला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश आले आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा

महाराष्ट्र काँग्रेसने माजी आमदार नारायणराव मुंडे यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन नाना गावंडे यांनी दिली आहे.

टॅग्स :काँग्रेसनाना पटोले