पांचाळ यांच्याकडून ‘नाइफ वर्क’चे उत्कृष्ट चित्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:27 AM2017-11-22T02:27:31+5:302017-11-22T02:27:38+5:30

मुंबई : चित्रांवर ‘नाइफ वर्क’ करणे फार कठीण असते. पण चित्रकार आनंद पांचाळ यांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्याचा वापर केला आहे.

Best Supporting Actor of 'Naif Work' by Panchal | पांचाळ यांच्याकडून ‘नाइफ वर्क’चे उत्कृष्ट चित्रदर्शन

पांचाळ यांच्याकडून ‘नाइफ वर्क’चे उत्कृष्ट चित्रदर्शन

Next

मुंबई : चित्रांवर ‘नाइफ वर्क’ करणे फार कठीण असते. पण चित्रकार आनंद पांचाळ यांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्याचा वापर केला आहे. त्यामुळे या चित्र प्रदर्शनाचे वेगळेपणे स्पष्ट होते, असे प्रतिपादन ‘श्लोक’च्या अध्यक्षा शीतल दर्डा यांनी मंगळवारी केले.
काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात प्रसिद्ध चित्रकार आनंद पांचाळ यांच्या ‘रेडिअन्स’ या शीर्षकांतर्गत चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शीतल दर्डा यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय संचालक ॠषी दर्डा उपस्थित होते. हे प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
पांचाळ यांनी भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित विविध चित्रे काढली आहेत. त्यामध्ये शांत धीरगंभीर मुद्रा, बुद्धमुद्रा, द्रोणागिरी घेऊन उड्डाण करणारा हनुमान ते शयनमुद्रेतील भगवान विष्णू अशा विविध रूपांचा समावेश आहे.
उद्घाटनप्रसंगी शीतल दर्डा म्हणाल्या की, ‘पांचाळ यांची चित्रकला दिवसेंदिवस बहरत आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये ते काहीतरी वेगळेपण दाखवतात. या चित्रांवर त्यांनी विशेष मेहनत घेत उत्कृष्टपणे ‘नाइफ वर्क’ केले आहे. ‘रेडिअन्स’मधून त्यांनी चित्रांना थ्रीडी इफेक्ट देण्याचा उत्तम प्रयत्न
केला आहे.’ तर चित्रकार आनंद पांचाळ म्हणाले, ‘आजच्या पिढीला मोबाइल आणि संगणकामधून
इतर गोष्टींंसाठी वेळ मिळत नाही. त्यांना विष्णूंच्या दशावतारांबद्दल विविध गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यातील प्रत्येक चित्र विष्णूच्या अवताराविषयी एक गोष्ट कथन करते.’

Web Title: Best Supporting Actor of 'Naif Work' by Panchal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई