मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:50 IST2023-01-25T16:50:34+5:302023-01-25T16:50:55+5:30
BEST Bus caught fire: मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही.

मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी
मुंबई - मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये बेस्टच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली. मात्र या आगीत बेस्टच्या बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
मुंबईत बेस्टच्या बसला भीषण आग, बालंबाल बचावले प्रवासी (व्हिडीओ - दत्ता खेडेकर) pic.twitter.com/3SL0Yh5TX4
— Lokmat (@lokmat) January 25, 2023