बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसची भर; गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 05:38 IST2025-07-11T05:38:09+5:302025-07-11T05:38:45+5:30

आयुर्मान संपलेल्या २,१६० बस मागील पाच वर्षांत बेस्टने भंगारात काढल्या. तर, केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केली.

BEST adds 10,000 buses to its fleet; buses on lease to avoid inconvenience | बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसची भर; गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर बस

बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसची भर; गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर बस

मुंबई - मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्त्वावर ६,५५५ बस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार करण्यात आला आहे. त्यापैकी २,१६७ बस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

येत्या ४ ते ५ वर्षांत बेस्टच्या ताफ्यात किमान १० हजार बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात असून त्यासाठीचे नियोजन केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. आमदार राजेश राठोड, आमदार सतेज पाटील, आमदार भाई जगताप यांनी मुंबईत बेस्ट बसची संख्या वाढविण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला आहे. आयुर्मान संपलेल्या २,१६० बस मागील पाच वर्षांत बेस्टने भंगारात काढल्या. तर, केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केली.

३,३३७ बेस्ट बसची आवश्यकता
मुंबईतील प्रवाशांना ३,३३७ बेस्ट बसची आवश्यकता आहे. मी बसेसमुळे नागरिकांना गर्दी व बसच्या दीर्घकाळ प्रतीक्षेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या कमी करण्यासाठी बेस्ट बसच्या ताफ्यात अधिक बस समाविष्ट करण्यासाठी काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न केला आहे. 

गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर बस
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बेस्टच्या ताफ्यातील बहुतांश बसचे आयुर्मान संपल्यामुळे निष्कासित करण्यात येत आहेत. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर बसगाड्या घेतल्या आहेत. बस पुरवठादार कंपन्यांकडून प्राप्त होणाऱ्या बसगाड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येला अनुसरून बसगाड्या प्रवर्तित करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे पुरवठादारांना उर्वरित बस लवकर पुरवण्यास सांगण्यात आले आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.

Web Title: BEST adds 10,000 buses to its fleet; buses on lease to avoid inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.