ही वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचीच लढाई; महाराष्ट्र टाइम्सच्या तीन आवृत्त्या बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 02:00 IST2020-05-22T01:59:03+5:302020-05-22T02:00:56+5:30
वृत्तपत्रांशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. पण सध्या घरोघरी वृत्तपत्र पोहोचणे अवघड झाले आहे, वृत्तपत्रांचा ज्यांना आर्थिक कणा मानले जाते, त्या जाहिराती बंद झाल्या आहेत.

ही वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचीच लढाई; महाराष्ट्र टाइम्सच्या तीन आवृत्त्या बंद
मुंबई : कोरोनामुळे जगभरात ५० लाख लोकांना आजारी आहेत, साडेतीन लाख लोकांचा बळी गेला आहे आणि प्रत्येक जण भीतीच्या छायेखाली आहे. जगभरातील अर्थव्यवस्था संकटात आहेत आणि आतापर्यंत करोडो लोकांचा रोजगार गेला आहे.
या भयावह संसर्गजन्य आजाराचा मोठा फटका सर्वच भाषांतील वृत्तपत्रांनीही बसला आहे. वृत्तपत्रांशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. पण सध्या घरोघरी वृत्तपत्र पोहोचणे अवघड झाले आहे, वृत्तपत्रांचा ज्यांना आर्थिक कणा मानले जाते, त्या जाहिराती बंद झाल्या आहेत. जाहिरातींची रक्कम सरकारकडून मिळण्यातही अडचणी येत आहेत. यामुळे महाराष्ट्र टाइम्सने राज्यातील कोल्हापूर, जळगाव आणि नगर या तीन आवृत्त्या बंद केल्या आणि देशात अनेक वृत्तपत्रांच्या बाबतीत हेच घडत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही वृत्तपत्रांना अशक्य झाले आहे आणि त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.
वृत्तपत्रांसाठी ही अस्तिस्त्वाचीच लढाई आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वर्तमानपत्रे प्रकाशित होतं आहेत, पण त्यासाठी वाचक आणि जाहिरातदार यांचे पाठबळही हवे. त्यांच्याविना टिकून राहणे शक्यच नाही. आर्थिक कणा मोडला की सारेच संपू शकते. तसे होऊ नये यासाठी आम्ही लढतच आहोत. पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही सर्वांचीच गरज आहे.