The basis of IIT research during the Kovid period | कोविड काळात आयआयटी संशोधनांचा आधार

कोविड काळात आयआयटी संशोधनांचा आधार

सीमा महांगडे

मुंबई : करोनाकाळात विविध संशोधन संस्थांनी आपआपल्या परीने या संकटांवर मात करण्यासाठी संशोधनाच्या सहाय्याने उपकरणे, आवश्यक साहित्य आणि सॉफ्टवेअर निर्मितीवर भर दिला. आपल्या वैविध्यपूर्ण संशोधनासाठी ओळखल्या जाणार्‍या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनीही या काळात आपल्या संशोधन व विकास विभागाच्या ( रिसर्च अँड डेव्हलपमेंट)  माध्यमातून आपल्या उत्कृष्ट  संशोधनांची ओळख जगाला करून दिली. कोविड काळात ४० हून अधिक प्रकल्पांचे काम आयआयटी मुंबईच्या संशोधन व विकास विभागाने हाती घेतले आहे. यामधील काही तर सध्या विविध रुग्णालये, उद्योगात वापरात असून काही बाजारात उपलब्ध झाली आहेत. यापैकी काहींची परवानगी प्रक्रियाही सुरु आहे.

भारतातील कोविड १९ चा प्रादुर्भाव पाहता त्यावरील संशोधने आणि उपाय योजनांसाठी, त्याच्या दुष्परिणामांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयआयटी बॉम्बे विविध रुग्णालये आणि उद्योगांशी भागीदारी करत आहे. यामधून आयआयटी बॉम्बेमधील संशोधक प्राध्यपकांकडून विविध प्रकारच्या वैद्यकीय उपकरणे, स्टेरलायझेशन मेथड्स, अँटिव्हायरल सप्लिमेंट्स, सॉफ्टवेअर सल्युशन्स आणि इतर वैद्यकीय संशोधने यांची निर्मिती करण्यात अली आहे, या सर्व उपकरणे आणि साधनांचा, उपाययोजनांचा कोविड काळात उपयोग होत आहे. विभागाच्या प्रयोगशाळेतील ही उत्पादने , उपकरणे मोठ्या प्रमाणावर समाजात पोहोचवण्याचा संशोधन व विकास विभागाचा प्रयत्न असून याबाबत त्यांची विविध उद्योगांशी बोलणी सुरू आहेत. कोविड १९ च्या काळात , निर्मिती करण्यात आलेल्या आयआयटी बॉम्बेच्या १३ संशोधनांना २२ कंपन्यांकडून आतापर्यंत परवाने मिळाले आहेत.  ड्युराप्रोट या मास्कची निर्मिती करण्यात आली असून ई कॉमर्स संकेतस्थळावर ते उपलब्धही करून देण्यात आले आहेत. युव्हीसी बेस्ड पोर्टेबल सॅनिटायझेशन युनिट्सला ही परवाना मिळाला आहे.  

 

 

 

 

४० हुन अधिक प्रकल्प

सॅनिटायझेशन, वैद्यकीय उपकरणे, वैयक्तिक सुरक्षितता, अँटिव्हायरल औषधे, आयटी सोल्युशन्स,  कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व नसणाऱ्या रुग्णावर पाळत  ठेवणारी उपकरणे, डायग्नोस्टिक ऍप्रोच या सर्व विषयांखाली विविध प्रकारचे ४० हून अधिक प्रकल्पाची निर्मिती आयआयटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाकडून करण्यात आली आहे. यामधील अनेक प्रकल्प परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत, काहींना परवानग्या मिळाल्या असून बाजारात ही उपलब्ध आहेत. ज्या संशोधन व प्रकल्पाना प्रत्यक्षिकांची आवश्यकता असते त्यांना संबंधित उद्योगांशी जोडून त्यांच्या ट्रायल्स घेण्यात आल्या आहेत. सीतू नसल जेल फॉर्म्युलेशन, मास्क व ग्लोव्जचे डिस्पोजल करण्यासाठी इन्सिनरेशन डिवाइस अशा उपकरणात याचा वापर केला गेला. युव्हीसी बेस्ड स्टरलायझेशन युनिट, फिटोफॉर्म्युलेशन्स फॉर वॉक थ्रू सॅनिटायझर्स, हॅन्डरब सॅनिटायझर्स, सर्फेस स्प्रे, बायोडिग्रेडेबल फेस शिल्ड्स, कोविड माईल्ड पेशन्ट्ससाठी हेल्मेट, श्वासोच्छ्वासाच्या त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी अंबु बॅग्स, ऍडव्हान्स्ड व्हेन्टिलेटर्स, आयसीयू व्हेंटीलेटर्स, अशा अनेक प्रकल्पांची चाचपणी आणि टेस्ट्स करूनच त्यांच्यावर पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.

जी उपकरणे लगेचच चाचण्यांशिवाय पुरविता येतील अशी उपकरणे ही लगेचच संस्थेकडून पुरविण्यात आली आहेत. इन्स्टिट्यूट फार्मसीकडून विकण्यात आलेले लो कॉस्ट मास्क, शासकीय रुग्णालयात देण्यात आलेले मास्क व पीपीई किट्स, फेस शिल्ड्स, रुग्णालयांना देण्यात आलेले एरोसोल बॉक्स, कव्हरऑल सूट्ससाठी युरीनेशन अटॅचमेंट्स यांसारख्या अत्यावश्यक उपकरणांची मदत करण्यात आली आहे.

आयटी सोल्युशन्स

ओडिसा आणि मेघालय येथे वापरण्यात येणारे व क्वारंटाईन लोकांसाठी तयार करण्यात आलेले कोरोनटाईन एप जे , लक्षणे असलेल्या नसलेल्या लोकांचा मागोवा घेणारे सेफ अँप, आयआयटी बॉम्बे व केईएम रुग्णालयात कार्यरत असलेले आणि रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी निर्मित केले वर्ल्ड वाईड हेल्प सॉफ्टवेअर आदी आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून निर्मित करण्यात आलेल्या संशोधनांची उदाहरणे आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लागणारा निधी हा विविध भागीदारी तत्त्वे आणि अंतर्गत स्रोत आणि शासनाकडून घेतलेली मदत यांमधून उभारण्यात आलेला आहे.

 

संशोधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात या काळात  समाजासाठी मैलाचा दगड ठरू शकतील अशा प्रकल्पांची, उत्पादनांची उभारणी प्रयोगशाळेत उभारण्याचा आयआयटी मुंबईतील संशोधन व विकास विभागाचा प्रयत्न आहे.

- प्रा. मिलिंद अत्रे, डीन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आयआयटी मुंबई

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The basis of IIT research during the Kovid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.