बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूकही जाहीर; २३ एप्रिल रोजी मतदान, ४ मे रोजी मतमोजणी; अजित पवार यांच्या जागी कोण आमदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:38 IST2026-03-16T06:37:38+5:302026-03-16T06:38:41+5:30

अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते.

Baramati, Rahuri assembly by-elections also announced; Voting on April 23, counting on May 4 Who will replace Ajit Pawar | बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूकही जाहीर; २३ एप्रिल रोजी मतदान, ४ मे रोजी मतमोजणी; अजित पवार यांच्या जागी कोण आमदार?

बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूकही जाहीर; २३ एप्रिल रोजी मतदान, ४ मे रोजी मतमोजणी; अजित पवार यांच्या जागी कोण आमदार?

मुंबई : निवडणूक आयोगाने रविवारी राज्यातील बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ३० मार्चला अधिसूचना जारी केली जाणार आहे.

अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते.

अजित पवार यांच्या जागी कोण आमदार?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना विधानसभा अथवा विधानपरिषदेपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक त्या लढविणार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

राहुरी विधानसभेसाठी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Web Title : बारामती, राहुरी विधानसभा उपचुनाव घोषित; 23 अप्रैल को मतदान, 4 मई को नतीजे

Web Summary : महाराष्ट्र के बारामती और राहुरी विधानसभा उपचुनाव 23 अप्रैल को होंगे, नतीजे 4 मई को आएंगे। अजित पवार के निधन के बाद बारामती सीट खाली हो गई। सुनेत्रा पवार के निर्विरोध चुनाव लड़ने की संभावना है। राहुरी में, भाजपा अक्षय कर्दिले को मैदान में उतार सकती है, जबकि शरद पवार समूह प्राजक्त तनपुरे को नामांकित कर सकता है।

Web Title : Baramati, Rahuri Assembly By-Elections Announced; Voting April 23rd, Results May 4th

Web Summary : Maharashtra's Baramati and Rahuri Assembly by-elections are set for April 23rd, with results on May 4th. Baramati's seat became vacant after Ajit Pawar's death. Sunetra Pawar is likely to contest unopposed. In Rahuri, the BJP may field Akshay Kardile, while Sharad Pawar's group may nominate Prajakt Tanpure.