#Bapmanus: 'Father's Day' celebration on social media! | #बापमाणूस : सोशल मीडियावर ‘फादर्स डे’चं सेलिब्रेशन!

#बापमाणूस : सोशल मीडियावर ‘फादर्स डे’चं सेलिब्रेशन!

ठळक मुद्देफादर्स डे निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्संनी वडिलांवर असलेले प्रेम व्यक्त केले. अनेकांनी आपल्या मार्गदात्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

मुंबई : फादर्स डे निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्संनी वडिलांवर असलेले प्रेम व्यक्त केले. अनेकांनी आपल्या मार्गदात्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप स्टेट्सवर वडिलांचे फोटो आणि यासोबत चारोळी अपलोड केली होती. 

फादर्स डे निमित्ताने ट्विटरवरून सेलिब्रेटींनी आपल्या वडिलांचे आभार मानले. आपल्या ट्विटरवरुन #फादर्स डे, #बापमाणूस असे हॅशटॅग वापरुन प्रचंड प्रमाणात मेसेज् व्हायरल झाले. कोरोना असल्याने फादर्स डे काही प्रमाणात घरातच साजरा करण्यात आला. आईवरील प्रेम अनेकजण पटकन व्यक्त करतात. मात्र, वडील म्हटले की, आधी त्यांचा कंबरेचा पट्टा आठवतो. त्यानंतर त्यांचा रागीट चेहरा आठवतो. त्यामुळे वडिलांविषयी जास्त काही बोलले जात नाही. मात्र रागीट चेहऱ्यामागील निरागस बापाचे मन दिसून येते. त्यामुळे फादर्स डे निमित्ताने वडिलांविषयी अनेकांनी चांगल्या, वाईट गोष्टीबद्दल लिहिले. वडिलांविषयीच्या गोष्टी, लेख, कविता, मेसेज युजर्सकडून व्हायरल करण्यात आले. 

वडिलांबद्दल असलेल्या प्रेमभावना, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फादर्स डे. फादर्स डे १९१० पासून साजरा केला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या तिवारी फादर्स डे साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान महत्त्वाचे असते. वडिलांबद्दलच्या भावना वडिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी फादर्स डे अनेक जण निवडतात. 

वडिलांना कलात्मक शुभेच्छा देण्यासाठी गुगलने भन्नाट शक्कल लढविली होती. गुगलच्या शोध पर्यायावर वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी चित्र काढण्यासाठी पर्याय दिले होते. काही कोलाज चित्रांचा वापर करून फादर्स डे च्या शुभेच्छा युजर्सनी सोशल मीडियावर अपलोड केल्या. 

आणखी बातम्या...

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

नवी मुंबईत 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीमधून पाहिले सूर्यग्रहण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: #Bapmanus: 'Father's Day' celebration on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.