VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:04 AM2022-10-05T09:04:12+5:302022-10-05T09:11:42+5:30

Bandra Worli Sea Link Accident: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Bandra Worli Sea Link Accident: Terrible accident on Bandra-Worli Sea link, 5 dead, 10 injured, three cars collide with ambulance | VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

VIDEO: वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला तीन कारची धडक

googlenewsNext

मुंबई - मुंबईतीलवांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील काहींची प्रकृती गंभीर आहे. आधी झालेल्या अपघातातील जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला भरधाव वेगात आलेल्या तीन गाड्यांनी ठोकल्याने हा अपघात घ़डल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर सी लिंक काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या वेळी वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्सची भीषण टक्कर झाली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. १२ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

वांद्रे वरळी सी लिंकवर एका गाडीचा आधीच अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले होते. मात्र ही रुग्णवाहिका जखमींना घेऊन जाण्यापूर्वी तीन अजून कारनी येऊन रुग्णवाहिकेला धडक दिली. त्यामुळे सी लिंकवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. य़ादरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच सी लिंक काही काळासाठी बंद करण्यात आला.  

Web Title: Bandra Worli Sea Link Accident: Terrible accident on Bandra-Worli Sea link, 5 dead, 10 injured, three cars collide with ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.