Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 21:08 IST2023-01-23T20:52:43+5:302023-01-23T21:08:43+5:30
Balasaheb Thackeray : विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमीत्त आज विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरकारकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आलं आहे.
'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी हे तैलचित्र साकारले असून, विधानभवनातील मुख्य सभागृहात ते लावण्यात येणार आहे.
खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर...