बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 05:13 PM2019-09-10T17:13:02+5:302019-09-10T17:13:31+5:30

बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील

Balabharati will publish books in Braille script from next year | बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

बालभारती पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करणार पुस्तके

googlenewsNext

मुंबई  - बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी आज वांद्रे येथील कार्यक्रमात केली.

नाशिक येथील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाईड तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन आज वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर ज्या कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडातून या गाईडचे प्रकाशन करण्यात आले आहे त्या बँकेचे संचालक स्वामीनाथन यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा अशी मागणी केली तीही मान्य करून मंत्री अशिष शेलार यांनी  हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच राज्यात अन्य भाषेतील आणि लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे प्रकाशित केली जातात त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके ही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या बालभारतीच्या बोर्डाच्या मिटिंग मध्ये घेण्यात आला आहे व त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे,असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून अंध विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्य पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध होतील अशी घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.

Web Title: Balabharati will publish books in Braille script from next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.