Join us

मनसे अन् शिवसेनेची युती होणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:42 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत.

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. आज राज ठाकरे यांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

उद्या राज्यातील मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार असून उद्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती, शिवसेनेशी युतीची चर्चा, राज ठाकरेंची मनसैनिकांचा महत्त्वाची सूचना, म्हणाले...

राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद घातली तर येऊ देत..मग बघू, असं उत्तर दिलं. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पुन्हा एका शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर देखील बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलं आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरेच बोलतील, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

कोरोना काळात मंत्री लपून बसले होते- शर्मिला ठाकरे

कोरोना काळात आपले सगळे मंत्री लपून बसले होते, फक्त आरोग्यमंत्री टोपे बाहेर दिसायचे. तेव्हा आमच्या पक्षाच्या लोकांनी रस्त्यावर स्टॉल टाकून रेमेडीसिव्हिर इंजेक्शन, बेड मिळवून देणे, पीपीई किट देणे, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापासून सगळं केलं. यात आमच्या पक्षातील काही तरुण पोरं गेलीत. त्यामुळे ज्यांना आमचा पक्ष दिसत नाही, त्यावर आम्ही काहीच उपाय करू शकत नाही. तेव्हाही पक्ष होता आणि आताही असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामनसेबाळा नांदगावकर