अविनाश भोसले यांचा मुलगा ‘ईडी’च्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:42 AM2021-02-12T03:42:30+5:302021-02-12T03:42:58+5:30

अटकेची टांगती तलवार कायम

Avinash Bhosales son in the ed custody | अविनाश भोसले यांचा मुलगा ‘ईडी’च्या ताब्यात

अविनाश भोसले यांचा मुलगा ‘ईडी’च्या ताब्यात

Next

मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची पुण्यातील कार्यालये व घरावर छापे टाकत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांचा मुलगा अमित भोसले यांना ताब्यात घेऊन मुंबईत आणले. बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. बुधवारपासून त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती. 

Web Title: Avinash Bhosales son in the ed custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.