Eknath Shinde: औरंगाबाद, पैठणचा दौरा जोरदार, एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ ट्विट करत ठाकरेंना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:11 IST2022-09-13T14:10:28+5:302022-09-13T14:11:06+5:30
Eknath Shinde: काल औरंगाबाद आणि पैठणचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे.

Eknath Shinde: औरंगाबाद, पैठणचा दौरा जोरदार, एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ ट्विट करत ठाकरेंना डिवचले
मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड करून राज्यात सत्तांतर घडवून आणल्यापासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, काल औरंगाबाद आणि पैठणचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद आणि पैठणच्या दौऱ्याला शिंदे समर्थकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामधून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर होत असलेल्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला होता.
छत्रपती श्री संभाजीनगर व पैठण दौरा pic.twitter.com/2dGpeI9pbP
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 13, 2022
दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याचा आढावा घेणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये संकटात पाय रोऊनी एकटा उभा ठाकतो, अनाथांचा नाथ गरीबांची साथ, मदतीचा हात एकनाथ या गीताच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच औरंगाबाद दौऱ्यात झालेली समर्थकांची गर्दी, एकनाथ शिंदेंकडून होणारी विकासकामं आदी दाखवण्यात आली आहेत.