मुंबईतील कंपनीची तब्बल १८५ कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:14 AM2021-07-01T08:14:13+5:302021-07-01T08:14:20+5:30

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

Assets worth Rs 185 crore seized from Mumbai-based company | मुंबईतील कंपनीची तब्बल १८५ कोटींची संपत्ती जप्त

मुंबईतील कंपनीची तब्बल १८५ कोटींची संपत्ती जप्त

Next
ठळक मुद्देया कंपन्यांचे प्रवर्तक आणि संचालकांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता कानपूर, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता आणि तामिळनाडूतील काही शहरांत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील एका कंपनीची १८५ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. १४ बँकांच्या समूहाची ३,५९२ कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल लि. असे या कंपनीचे नाव असून, तिच्या काही सहयोगी कंपन्यांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. ग्लोबिझ एक्झिम प्रा. लि., एनएसडी निर्माण प्रा. लि., आर. एस. बिल्डर्स यांचा त्यात समावेश आहे.

या कंपन्यांचे प्रवर्तक आणि संचालकांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता कानपूर, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता आणि तामिळनाडूतील काही शहरांत आहेत. त्या जप्त करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
ही कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरुद्ध सीबीआयने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ईडीने ही कारवाई केली. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘फ्राॅस्ट इंटरनॅशनल’ने बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम अन्यत्र वळविली. या रकमेतून समूहातील इतर कंपन्या व व्यक्तींच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यात आल्या.

Web Title: Assets worth Rs 185 crore seized from Mumbai-based company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.