Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवर झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 13:43 IST

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आशिष शेलार यांनी शनिवारी सकाळी (ता. 14 एप्रिल) राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थान राज ठाकरेंची भेट घेतली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अचानक व गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण असेल, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेआशीष शेलारमनसेभाजपा