काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 15:20 IST2019-10-02T15:07:33+5:302019-10-02T15:20:59+5:30
'भाजपचे विरोधक सारे गारद झाले'

काँग्रेसचे 'पृथ्वीअस्त्र' भयभीत होऊन पळाले, शेलारांचा चव्हाणांना टोला
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आता सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
सातारा लोकसभेसाठी भाजपाने उमेदवारी उदयनराजे भोसले यांना दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी-काँग्रेसने अद्याप या जागेसाठी कोणताही उमेदवार दिला नाही. पण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला पाठिंबा मिळत होता. मात्र, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून पृथ्वीराज चव्हान यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार म्हणाले, "जय जय महाराष्ट्र माझा...गर्जा महाराष्ट्र माझा! उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा! सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे "पृथ्वीअस्त्र" भयभीत होऊन पळाले.. भाजपचे विरोधक सारे गारद झाले..दिल्ली..अमेरिकेच्या तख्तापर्यंत गरजतात सारे! गरजा महाराष्ट्र माझा."
जय जय महाराष्ट्र माझा...गर्जा महाराष्ट्र माझा!
— ashish shelar (@ShelarAshish) October 2, 2019
उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा!
सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे "पृथ्वीअस्त्र" भयभीत होऊन पळाले..
भाजपचे विरोधक सारे गारद झाले
दिल्ली..अमेरिकेच्या तख्तापर्यंत गरजतात सारे!गरजा महाराष्ट्र माझा! #महाजनादेश