'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:17 PM2020-01-13T13:17:03+5:302020-01-13T13:18:59+5:30

वाडिया रुग्णालय तातडीने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी

Ashish Shelar attack on Shiv sena on Wadia Hospital issue | 'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

Next

मुंबई -  राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून येणारा निधी थकल्याने  बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या वाडिया रुग्णालयावरून भाजपा नेते आशीष शेलार यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. लहान मुलांवरील उपचारांसाठी मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेले वाडिया रुग्णालय बंद करून कोट्यवधीची मोक्याची जागा हडप करण्याचे वाडिया आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र आहे, असा आरोप आशीष शेलार यांनी केला आहे. 

आर्थिक अडचणींमुळे वाडिया रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भाजपा नेते आशीष शेलार यांनी ट्विट करून मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना आणि वाडिया रुग्णालय प्रशासनावर  जोरदार  टीका केली आहे. ''वाडिया रुग्णालय आणि महापालिका यामध्ये सुरू असलेली तू तू मै मै मागे वेगळाच "डाव"? आहे.  हे रुग्णालय बंद करून कोट्यवधीची मोक्याची जागा हडप करण्याचे वाडिया आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हे षडयंत्र आहे. आम्ही तुमचा हा डाव हाणून पाडू. त्यासाठी रस्त्यावर उतरू,'' असा इशारा शेलार यांनी दिला आहे. तसेच वाडिया रुग्णालय तातडीने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 



राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून येणारा निधी थकल्याने वाडिया रुग्णालय आर्थिक अडचणीत सापडले आहे. औषधांचा साठा संपल्याने रुग्णालय प्रशासनाने नव्या रुग्णांना प्रवेश देणे थांबवले आहे. तसेच 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. निधी अभावी रुग्णसेवेवर परिणाम झाला असून,  शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका रुग्णांना बसत आहे. 

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; निधीअभावी शस्त्रक्रिया रद्द, 300 रुग्णांना डिस्चार्ज 

वाडिया रुग्णालयाला पैसे कधी देणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

वाडिया रुग्णालयाचे खासगीकरण नको, परिचारिकेने उठविला आवाज

वाडिया हॉस्पिटलमध्ये 8 वर्षांच्या मुलाला मिळाली नवसंजीवनी,मोठी शस्त्रक्रिया यशस्वी

 वाडिया रुग्णालयाचा २०० कोटींपेक्षा अधिक निधी राज्य सरकार रआणि महापालिकेकडे खडला आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेने रुग्णालय प्रशासनाला १३ कोटी निधी दिले. मात्र या तुटपुंज्या निधीत रुग्णालय चालवणं अवघड असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक विभागांमधल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शस्त्रक्रियादेखील रद्द केल्या आहेत. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.  

Web Title: Ashish Shelar attack on Shiv sena on Wadia Hospital issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.