Join us

मुंबईत ऑक्सिजन सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री करणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:07 IST

मुंबईच्या जोगीश्वरी भागातून पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून मोठया प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. जोगेश्वरी पश्चिम भागात मेडिकलमध्ये वापरात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मुंबई - देश सध्या कोरोनाच्या महारामारीच्या संकटाला सामोरे जात आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वचजण या संकटाचा सामना करत आहेत. प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. आप-आपल्या परीने मदतही करत आहेत. मात्र, या महामारीतही काहीजण आपला फायदा पाहून काळ्या बाजारात वैद्यकीय साहित्याची विक्री करताना दिसून येतात. पोलिसांनी रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. आता, ऑक्सिजन सिलेंडरचीही काळ्या बाजारात विक्री करताना एकास पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबईच्या जोगीश्वरी भागातून पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून मोठया प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. जोगेश्वरी पश्चिम भागात मेडिकलमध्ये वापरात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यामध्ये, 25 ऑक्सिजन सिलेंडर, 12 ऑक्सिजन कीट आणि इतरही साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी अमर पठाण यांनी सांगितलं.   

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीऑक्सिजनपोलिस