राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 12:35 PM2021-08-06T12:35:13+5:302021-08-06T12:35:42+5:30

Folk Artists: राज्यातील लोककलावंतांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले आहेत.

Approval to provide grants to folk artists in the state | राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता

राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता

googlenewsNext

मुंबई : राज्यातील लोककलावंतांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले आहेत.
लोककलावंत, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड काळात आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून, राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून, यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ५४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार आहे. 

जवळपास ५४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून, यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Approval to provide grants to folk artists in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.