किशोर निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:40 IST2021-11-26T19:39:27+5:302021-11-26T19:40:12+5:30
MPSC News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

किशोर निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर करण्यात येत आहे. सदर नियुक्ती ही त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिवसापासून सहा वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत असेल, असे या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.