Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 06:10 IST2025-12-05T06:09:46+5:302025-12-05T06:10:40+5:30
Anoushka Shankar Sitar Damaged: एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची सतार तुटली.

Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
मुंबई : एअर इंडियाच्याविमानाने प्रवास करताना विख्यात सतारवादक अनुष्का शंकर यांची सतार तुटल्याने त्यांनी एअर इंडिया विरोधात संपात व्यक्त केला आहे. एका सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांनी या घटनेची माहिती आणि तुटलेल्या सतारचा फोटो प्रसारित करून ही माहिती दिली आहे. त्याची दखल घेत एअर इंडियाने सतारीच्या दुरुस्तीचा खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे.
विमान प्रवासानंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी बॉक्समधून सतार काढून वाजवण्यास सुरुवात केली असता ती नीट वाजली नाही. त्यामुळे त्यांनी सतारीची सखोल पाहणी केली असता ती तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले.
विमान कर्मचाऱ्यांनी त्यांचे सामान नीट न हाताळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एअर इंडियाला टॅग करून पोस्ट लिहिली आहे.
अनुष्का यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी एअर इंडियाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या पोस्टनंतर एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली असून, सतारीच्या दुरुस्तीचा खर्च देण्याची हमीही दिली आहे.
एअर इंडियाचे कर्मचारी इतके बेपर्वा कसे?
‘माझी सतार सुरक्षित ठेवण्यासाठी मी उत्तम दर्जाचा महागडा बॉक्स वापरते. अशा विशेष वस्तूंकरिता तुम्ही अतिरिक्त पैसे घेता. ते पैसेही मी भरले आहेत. तरी इतक्या बेपर्वाईने तुम्ही वस्तूंची हाताळणी कशी करू शकता,’ असा प्रश्न अनुष्का शंकर यांनी उपस्थित केला आहे.