Join us

... यांना पायताणाने मारले पाहिजे; अनिल गोटे यांची फडणवीस सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:38 IST

फडणवीस सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत.

मुंबई : गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडला आहे. मी जबाबदारीने बोलत आहे. याचे पुरावे आहेत. पुरावे, कागदपत्रांशिवाय कधीही मी बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात एवढा घोळ केलाय की उभ्या महाराष्ट्राने या लोकांना पायताणाने मारले पाहिजे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्य़ांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणाला वैतागून मी राजीनामा दिला. लोकांचाही विश्वास उडाला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. मलाही दिलेला शब्द त्यांनी पाळला नसल्याचा आरोप गोटे यांनी केला. 

मी त्यांच्यावर प्रेम केले. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आले. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता राजघराणी आणि राजकीय घराणीच भाजपात आली आहेत. या घराण्यांसाठीच पक्ष चालवता का? असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला आहे. 

एमएसआरडीसीचे संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावरही टीका करताना गोटे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे. मोपलवार यांच्यासारखा भ्रष्ट माणूस जर फडणवीसांना चालत असेल तर काय म्हणायचे? काही बोलायची गरज नाही. प्रत्येक गावात घोटाळे केलेत. याची यादीच असल्याचे सांगताना त्यांनीी समृद्धी महामार्गातही मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :अनिल गोटेदेवेंद्र फडणवीसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज