Anil Deshmukh to be questioned by CBI today | Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची आज हाेणार सीबीआय चौकशी

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची आज हाेणार सीबीआय चौकशी

मुंबई : दरमहा १०० कोटी हप्ता वसुलीच्या करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) चौकशी केली जाईल. जबाब नोंदवण्यासाठी सकाळी अकरा वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
रविवारी याचप्रकरणी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची सुमारे आठ तास चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. आता देशमुख यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल  निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करणार आहे.
 माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून याप्रकरणी चाैकशी केली जात आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anil Deshmukh to be questioned by CBI today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.