Join us

Amrita Fadnavis: गायनावरून मुख्यमंत्र्यांच्या तिरकस टोल्याला अमृता फडणवीसांकडून खोचक प्रत्युत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:33 IST

Amrita Fadnavis: काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी गायनावरून अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला होता. त्याला आता अमृता फडणवीस यांनीही खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राज्यातील राजकीय परिस्थितीवरून राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीवर आणि विशेषकरून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. दरम्यान, काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी गायनावरून अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला होता. त्याला आता अमृता फडणवीस यांनीही खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी मेहुण्याच्या संपत्तीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, मला सुद्धा धक्का होता. मला वाटलं होतं, अबजाधीश फक्त आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊसुद्धा आब्जाधीशच आहे! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात!! असा टोला त्यांनी लगावला.

गायनाचा छंद जोपासणाऱ्या अमृता फडणवीस ह्या त्यांच्या गायनावरून ट्रोल होत असतात. त्यातच काल उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या गायनावरून खोचक टोला लगावला होता. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगले गातात, असं मला आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. तेव्हा मला धक्काच बसला होता. तोपर्यंत मला केवळ एकच व्यक्ती गाते, असं वाटायचं, आता कळलं की सगळेच गातात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.

टॅग्स :अमृता फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा