Join us  

अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी, कुत्तों को शेरनी कभी जवाब नही देती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 9:51 AM

अमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं होतं.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं होतं.

मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. सोमवारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून अनेकांचं मोठं नुकसान झालंय. या वादळाला अनुसरुन अमृता फडणवीस यांनी शायरी केली होती. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि अमृता फडणवीस यांच्या ट्विटर वॉर रंगलं आहे.

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. अमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं होतं. आता, अमृता यांनी पुन्हा एकदा शायरी ट्विट करुन टीकाकारांना सुनावलं आहे. 

जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो,शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !

असे ट्विट अमृता यांनी केलंय. अमृता यांच्या ट्विटनंतर रुपाली चाकणकर यांनीही या ट्विटला अनुसरुनच ट्विट केलंय. त्यामध्ये, शेरनी असं वर्णनही केलंय. 

जंगल की शेरनी शिकार करती है...सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय. 

अमृता फडणवीसांची पहिली शायरी

तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है,देखें अबके किसका नंबर आता है !, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर, रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलंय. 

चाकणकरांचे जवाब

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला हैमहाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है,  साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय. 

कोरोनात वादळाचे संकट

महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

टॅग्स :अमृता फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसतौत्के चक्रीवादळट्विटर