निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

By मनोहर कुंभेजकर | Published: April 29, 2024 08:00 PM2024-04-29T20:00:48+5:302024-04-29T20:02:37+5:30

अर्ज भरून झाल्यावर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला होणार सुरूवात

Amol Kirtikar of Uddhav Thackeray Shivsena group will file candidature application on May 2 | निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

निवडणूक ही एक लढाई, २ मे रोजी निवडणूक अर्ज भरणार- ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर

मनोहर कुंभेजकर, मुंबई: उत्तर पश्चिम मध्ये महाविकास आघाडीचा बोलाबाला असून आमची महाविकास आघाडी असून आम्ही प्रचारात सुद्धा आघाडी घेतली आहे. प्रचाराचे दोन टप्पे झाले आहे. २ मे रोजी मी निवडणूक अर्ज भरणार असून, प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. निवडणूक ही एक लढाई असूनआपण यात निश्चित विजयी होऊ, असा ठाम विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केला. अंधेरी पश्चिम, इंडियन ऑईल जंक्शन जवळील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

शिवसेना नेते विभागप्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव, उपनेत्या व महिला विभाग संघटक राजुल पटेल, उद्धव ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस मोहसीन हैदर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमोल कीर्तिकर यांनी पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधला.  यावेळी महाविकास आघाडीचे इतर मान्यवर नेते व अंधेरी पश्चिम विधानसभेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Amol Kirtikar of Uddhav Thackeray Shivsena group will file candidature application on May 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.